लातूर(Latur):- उदगीर येथे नगरपरिषदेने उभारलेल्या बुद्ध विहाराचे(Buddha Vihar) उद्घाटन ४ सप्टेंबर २०२४ रोजी होत आहे. या कार्यक्रमाला भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu)उपस्थित राहणार आहेत. तसेच यादिवशी राज्य शासनाच्यावतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानालाही त्या उपस्थित राहणार असल्याची माहिती
या समारंभाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्य शासनाने उदगीर नगरपरिषदेला दिलेल्या निधीतून उदगीर शहरातील तळवेस येथे बुध्द विहाराचे बांधकाम करण्यात आले आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथील बुध्द विहाराची प्रतिकृती असलेल्या उदगीर येथील बुध्द विहाराचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ४ सप्टेंबर रोजी होणार आहे.
राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थी महिलांचा गौरव
राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांच्या लाभार्थी महिलांचा गौरव ४ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हास्तरावर विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सर्व पथकांच्या प्रमुखांची बैठक घेवून मंगळवारी आढावा घेतला. तसेच प्रत्येक पथकाने आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पडण्याच्या सूचना केल्या. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.