वाशिम (Washim):- जिल्ह्यातील ख्यातनाम ग्रामीण कवी तथा कथाकार पांडुरंग शंकर मोरे यांचे १७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन (Death) झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते.
१७ ऑगस्ट रोजी प्रदीर्घ आजाराने निधन
तालुक्यातील पंचाळा येथील पांडुरंग मोरे अलीकडच्या काळात वाशिममध्ये वास्तव्यास होते. पांडुरंग मोरे यांचा ‘आथारी’ हा गाजलेला कथासंग्रह (Anthology) होय. शेतकरी कुटुंबातून असलेले पांडुरंग मोरे हे ग्रामीण साहित्यिक(Literary) म्हणून साहित्य क्षेत्रात परिचित होते. कथासंग्रह, काव्यरचना, लेख आदी स्वरूपात विपुल साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. त्यांचा ‘ आथारी ‘ हा कथासंग्रह साहित्य विश्वात गाजलेला कथासंग्रह आहे. शेती व्यवसायासह व्यापारातही त्यांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण करून ठेवली आहे. गत काही दिवसांपासून ते आजारी होते. अशातच शनिवारी त्यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.