परभणी (Parbhani):- शहरातील जिंतूर रोडवर आयटीआय कॉर्नर जवळ असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम मशीन दोरीच्या सहाय्याने बांधुन चोरुन नेण्याचा प्रयत्न रात्र गस्तीवर असलेल्या नानलपेठ पोलीसाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना रविवार १ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime)दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नानलपेठ पोलीसांच्या सर्तकतेमुळे पुढील अनर्थ टळला
या घटने वियषी अधिक माहिती अशी की, आयटीआय कॉर्नर येथे एसबीआय बँकेचे एटीएम आहे. सदरचे एटीएम मशीन दोरीच्या सहाय्याने बांधुन नेण्याचा प्रयत्न रात्री चोरट्यांनी केला. मशीनचे सायरन वाजल्याने बँक कर्मचार्यांना याची माहिती मिळाल्या नंतर त्यांनी लगेच पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्याच दरम्यान रात्र गस्तीवर असलेले नानलपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि कारवार यांचे पथक घटना स्थळी दाखल झाले. मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे,पोनि चितांबर कामठेवाड, पोह संतोष सानप, निलेश कांबळे, निळकंठे, नरहरी मुरकुटे, घरजाळे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली.
रविवार १ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजताची घटना
जिंतूर रोडवरील आयटीआय कॉर्नर जवळ असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न रविवार १ सप्टेंंबर रोजी पहाटे ३:३० च्या सुमारास घडला. त्यावेळी रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांनी तात्काळ सतर्कता दाखविली. आयटीआय (ITI)कॉर्नर वरील एटीएम मशीन चोरी करणारे चोरटे आणि त्यांचे वाहन सिसिटीव्ही कॅमेर्यात वैâद झाले आहेत. चोरट्यांनी दोरीच्या सहाय्याने मशीनला बांधुन चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसत आहे. सिसिटीव्हीतील फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.