नांदेड (ATM machine) : जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच (ATM machine) पळवल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. बारड- भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच (Bank of Maharashtra) बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे. दरम्यान रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली. एटीएम मशीनची चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडल्याचे निदर्शनास आले. त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण? याचा तपास लावणे (Nanded Police) पोलिसांसमोर आव्हान बनले आहे.
नांदेड जिल्ह्यातील बारड येथील घटना
सदर मशीन चोरीची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. (Nanded Police) पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी मोठी दोरी आणि एक पोत आढळून आले आहे. सदर चोरीच्या घटनेचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान (ATM machine) एटीएम मशिनमध्ये रक्कम किती होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.