हरदोली/सिहोरा (Sihora):- सिहोरा पोलीस स्टेशनंच्या अगदी हाकेच्या अंतरावर आणि तुमसर-बपेरा राष्ट्रीय महामार्गांवर असलेल्या ‘बँक ऑफ इंडिया’ (Bank of india) शाखेची एटीएम मशीन अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतू मशीन तुटल्याने फसला. शुक्रवार दि.९ ऑगस्ट रात्री च्या सुमारास ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.
बँक ऑफ इंडिया चे शाखा व्यवस्थापक समीर निंबार्ते यांनी दि.१० ऑगस्टला दिली माहिती
त्यावरून अज्ञात आरोपी विरूद्ध गुन्हा (Crime)दाखल करण्यात आला आहे. तुमसर-बपेरा या वर्दळीच्या राष्ट्रीय महामार्गावर ‘बँक ऑफ इंडिया’ बँकेचे (EPS Company) चे एटीएम आहे. अज्ञात चोरट्याने या एटीएमच्या मशीन समोरील बाजूच्या लॉकरचे लोखंडी झाकण उघडले. एटीएम मशीनमधून रोख रक्कम बाहेर येण्यासाठी असलेला रोलर तोडून एटीएममधून रक्कम चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मशीन पूर्णपणे न फुटल्याने किंवा काही नागरिकांना ही घटना लक्षात आली असावी या कारणांनी चोरट्यांनी तिथून काढता पाय घेतला असावा असा अंदाज आहे.
सदर घटनेची माहिती होताच सिहोरा ठाण्याचे ठाणेदार नितीन मदणकर यांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली आहे. पुढील तपास सिहोरा बिट अंमलदार मनोज इळपाते करीत आहे. एटीएम मशीन फोडण्याची घटना प्रथमच सिहोर्यात घडली आहे. याआदी असा प्रकार झालेला नाही. मशीन तोडून लाखोची रोकड लंपास करण्याचा चोरांचा प्रयत्न होता. या घटनेने एका पेक्षा अधिक चोरट्याचा समावेश असल्याचा संशय आहे. मागील ५ वर्षांमध्ये ७ ते ८ घरफोड्या झालेल्या होत्या. मात्र अद्याप त्यांचा सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या घटनेतील आरोपी मोकाटच राहतील की काय? असा प्रश्न पुन्हा उभा ठाकलेला आहे.