परभणी (Parbhani):- बदलापुर, कोलकत्ता येथे झालेल्या अत्याचार(torture) घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपा महानगर व भाजपा युवामोर्चा तसेच महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार २४ ऑगस्ट रोजी परभणीत निषेध आंदोलन करण्यात आले.
महाविकास आघाडी, भाजपाचे परभणीत निषेध आंदोलन
भाजपा महानगर व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. मेघना बोर्डीकर, विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, महानगर अध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, अक्षय डहाळे, उमेश शेळके, संजय रिजवाणी, मोहन कुलकर्णी, कमलकिशोर अग्रवाल, मधुकर गव्हाणे, उमेश शेळके, डॉ. मनोज पोरवाल, विजय गायकवाड, प्रभावती अन्नपुर्वे, संदीप जाधव, संजय जोशी, सरपंच उध्दवराव गायकवाड, उमाकांत भरोसे, गुलाबराव पंढरकर, संजय शामर्थी, रोहित जगदाळे, शिवाजी शेळके, मो. गौस, रितेश जैन, मुकेश गाढे, ओम मुदीराज, रामदास पवार, एकनाथ चव्हाण, दिपक शिंदे, अनंता गिरी, महेंद्र धबाले, शिवाजी तरवटे, दत्तराव दौंड, योगेश तरवटे, पप्पु खुळे, जीवन जावळे यांची उपस्थिती होती. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नेते, पदाधिकार्यांनी परभणीतील छत्रपती शिवाजी चौकात तोंडाला काळ्या फिती लावून तसेच हातात काळे झेंडे घेत अत्याचारांच्या घटनेचा निषेध केला.
महाराष्ट्रातील महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेस शहराध्यक्ष नदीम इनामदार, शिवसेना संपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर, राष्ट्रवादी काँग्रेस परभणी शहराध्यक्ष जाकेर लाला, रामभाऊ घाटगे, बाळासाहेब देशमुख, पंजाब देशमुख, अब्दुल सईद, अतिक उर रहेमान, अजय गव्हाणे, विकास लंगोटे, मोईन मौली, ज्ञानेश्वर पवार, श्रीकांत पाटील, नागेश सोनपसारे, मिन्हाज कादरी, अर्जून सामाले, दिगंबर खरवडे, मतीन शेख, बाळू तळेकर, वैजनाथ देवकते, जानु बी, शिंगणकर आदींची उपस्थिती होती.