नागपूर (Anil Deshmukh): महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गादीवर दगडफेक केली. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख गंभीर जखमी झाले. काटोल विधानसभा मतदारसंघामधील नरखेडमधील सभा संपल्यानंतर (Anil Deshmukh) अनिल देशमुख परत येत असतांना हा हल्ला करण्यात आला. अनिल देशमुखांची (Anil Deshmukh) गाडी काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गाडीवर हल्ला केला.
Video of Anil Deshmukh, former Minister, after the incident. He reportedly sustained injuries after a few individuals pelted stones at his car in Katol Legislative Assembly Constituency. He was on his way back after a public meeting in Narkhed. His son, Salil Deshmukh, is… pic.twitter.com/C61IoqM2yr
— Anjaya Anparthi (@anjaya1905) November 18, 2024
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता. काटोल विधानसभा मतदारसंघामधील सभा संपल्यानंतर परत येत असतांना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात अनिल देशमुख (Anil Deshmukh) गंभीर जखमी झाले. माहितीनुसार गाडीवर फेकण्यात आलेल्या दगडामुळे समोरील काचे फुटली. त्या काचेचे तुकडे अनिल देशमुखांच्या डोक्याला लागले. या हल्ल्यानंतर (Anil Deshmukh) अनिल देशमुख यांना काटोल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.