खलिस्तानी समर्थकांनी भारताचा झेंडा फाडला
नवी दिल्ली (Attack on Jaishankar) : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (Attack on Jaishankar) यांच्यावर लंडनमध्ये खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. चॅथम हाऊसमधील वादविवाद सत्रातून ते बाहेर पडत असताना, काही (Khalistani Supporter) अतिरेकी निदर्शकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एका व्हिडिओमध्ये एक निदर्शक जयशंकर यांच्या गाडीकडे धावत असल्याचे आणि पोलिसांच्या उपस्थितीत भारतीय ध्वज फाडताना दिसत आहे. (British Police) ब्रिटीश पोलिस तिथे उपस्थित होते, पण त्यांनी कोणतीही त्वरित कारवाई केली नाही. खलिस्तान समर्थक आंदोलकांनी जयशंकर यांच्या कार्यक्रमात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. ते झेंडे फडकावत निषेध करत होते.
EAM Dr. Jaishankar security was compromised when ISI paid Khalistani terroπist tried to attack his car – British Police & Security Agencies didn't stop them; this must be viewed seriously pic.twitter.com/tKQzo5xb3y
— Mihir Jha (@MihirkJha) March 6, 2025
जयशंकर यांचा युकेचा अधिकृत दौरा
जयशंकर (Attack on Jaishankar) 4 ते 9 मार्च 2025 दरम्यान युकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या भेटीचा मुख्य उद्देश भारत-ब्रिटन धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे आहे. त्यांच्या चर्चेत व्यापार, संरक्षण, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली.
आयर्लंड प्रवासावरही परिणाम होणार?
6-7 मार्च रोजी जयशंकर (Attack on Jaishankar) आयर्लंडला भेट देतील, जिथे ते आयर्लंडचे परराष्ट्र मंत्री सायमन हॅरिस यांची भेट घेतील. ते आयर्लंडमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाशीही संवाद साधतील.
परदेशात भारतीय राजदूतांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
या घटनेमुळे परदेशात भारतीय अधिकाऱ्यांच्या (Attack on Jaishankar) सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका यांसारख्या देशांमध्ये (Khalistani Supporter) खलिस्तानी समर्थकांकडून वारंवार होणारे हल्ले चिंतेचा विषय बनले आहेत. (British Police) ब्रिटिश पोलिसांच्या निष्क्रियतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, भारतीय मान्यवरांची सुरक्षा का सुनिश्चित केली गेली नाही?




