नांदेड(Nanded):- किनवट शहरातील भर बाजारात पत्नीच्या अंगावर पतीने पेट्रोल (Petrol) टाकून पेटवून दिल्याची घटना 11 मे रोजी घडली. याप्रकरणी किनवट पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी पतीस अटक केली असून त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.
आग विझविल्याने प्रियंकाला मिळाले जीवदान
किनवट येथील रहिवासी पती अर्जुन सातपुते व त्याची पत्नी प्रियंका या दोघांमध्ये बेबनाव असल्याने तीन वर्षांपासून पती – पत्नी विभक्त राहत असत. याचा राग मनात धरून प्रियंका ही 11 मे रोजी भाजीपाला खरेदी करण्यासाठी बाजारात आली असता तिचा पती अर्जुन याने अंगावर पेट्रोल ओतून भर बाजारात पेटवून दिले होते, परंतु तेथील व्यापाऱ्यांनी वेळीच अंगावर पाणी ओतून आग (fire) विझविल्याने प्रियंकाला जीवदान मिळाले.या प्रकरणी प्रियंका सातपुते यांनी दिलेल्या जवाबावरुन किनवट पोलिसांनी अर्जुन सातपुते विरुद्ध गुन्हा दाखल (Filed a case) करून अटक केली असून त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोउपनि गणेश गोटके हे करीत आहेत.