दोन तरुणांना गंगाखेड पोलिसांनी केली अटक
परभणी/गंगाखेड (Girl sexual assault) : खाजगी शिकवणी वर्गासाठी जाणाऱ्या एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीस ऑटोमध्ये बसवून परळी रस्त्यावरील मार्केट यार्डात सामसूम ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार (Girl sexual assault) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणांना पोलीसांनी वेळीच ताब्यात घेऊन अटक केल्याने मोठा अनर्थ टळल्याची घटना दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिराने (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
माहितीनुसार, इयत्ता नववीच्या वर्गात शिकणारी तेरा वर्ष पाच महिने वयाची अल्पवयीन मुलगी खाजगी शिकवणी वर्गासाठी जात असतांना गेल्या दहा दिवसांपूर्वी तिचा पाठलाग करून मोबाईल नंबरची चिठ्ठी अंगावर टाकली तेंव्हा अल्पवयीन मुलीने मोबाईल नंबरची चिठ्ठी पाहून फाडून फेकून दिली होती. दि. ४ सप्टेंबर बुधवार रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी शिकवणी वर्गासाठी जात असतांना अंगावर चिठ्ठी टाकून जाणाऱ्या ऑटो चालकाने तिला रस्त्यात गाठून तू मला फोन का लावला नाही असे म्हटल्याने त्यास पुढे जा म्हणत अल्पवयीन मुलगी होळकर चौकात आली असता ऑटो चालक तिचा पाठलाग करत तिथपर्यंत आला.
पाठीमागे का येतो असे मुलीने विचारताच त्याने तिला ऑटोमध्ये बस म्हटले ऑटोत बसण्यास मुलीने नकार दिल्याने त्याने तिला जोरात बोलल्याने घाबरून ती ऑटोत बसली असता दिलकश चौक येथून एका मित्राला सोबत घेऊन त्याने ऑटो डॉक्टर लाईन मार्गे परळी रस्त्यावरील सामसूम ठिकाणी एका बंद घराच्या पाठीमागे नेत ऑटोतील मॅट खाली अथरून अल्पवयीन मुलगी नकार देत असतांना सुद्धा तिचे हात दाबून धरत तिच्यावर अत्याचार (Girl sexual assault) करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी आलेल्या (Gangakhed Police) पोलीसांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ऑटो चालक अनिल बापूराव जाधव वय २३ वर्ष व त्यास मदत करणारा त्याचा मित्र भैय्यासाहेब शंकर इंगळे दोघे रा. गौतम नगर गंगाखेड यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिराने दोघांविरुद्ध अत्याचाराच्या कलमांसह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.
पोलीसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
गंगाखेड येथून परळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड परिसरात सामसूम ठिकाणी दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीस ऑटोमध्ये बसवून नेल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली (Gangakhed Police) सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी सिंगणवाड यांनी क्षणाचा ही विलंब न करता परळी रस्त्यावरील सामसूम ठिकाणी तातडीने धाव घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनिल बापूराव जाधव व त्यास मदत करणाऱ्या भैय्यासाहेब शंकर इंगळे यांना पकडून ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.