परभणी (Parbhani):- सकल ओबीसी (OBC)समाजाच्या वतीने शनिवार १३ जुलै रोजी उपोषण मैदान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन करत विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. यावेळी सकल ओबीसी समाज बांधवांची उपस्थिती होती.
महाराष्ट्राचा पहिला जांगर गोंधळ आंदोलन परभणीत
महात्मा फुलै चौक येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन करत आंदालनाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा मार्गे उपोषण मैदार येथे आंदोलनकर्ते आले. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, शिंदे समिती रद्द करावी, सगेसोयरे अध्यादेश लागू करावा, अनाधिकृत कुणबी प्रमाणपत्र (Kunbi certificate) रद्द करावे, कुणबी प्रमाणपत्रावर झालेली नोकरभरती रद्द करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना तात्काळ वसतीगृह (hostel)बांधण्यात यावे, महाज्योतीस तात्काळ बार्टी, सारथीच्या धरतीवर निधी देण्यात यावा, पीएचडी धारक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप लागू करण्यात यावी, ओबीसी आंदोलकांवरील गुन्हे, रद्द करावेत आदी मागण्या जागरण गोंधळ आंदोलनात करण्यात आल्या.