औंढा नागनाथ (Aundha Crime) : हिंगोली शहरातील सराफा व्यावसायीक आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून २५ डिसेंबरला हिंगोलीला येत असताना येडूत शिवारात त्यांची मोटारसायकल अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या जवळील ५ लाख ५५ हजार रूपयाचे सोन्याचे दागिने व बॅग जबरीने चोरून नेल्याने औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, (Aundha Crime) हिंगोली शहरातील टाले हॉली गल्लीमधील संतोष शिवकुमार सराफ हे २५ डिसेंबर रोजी आपल्या पत्नीसह औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण येथून मोटारसायकलवरून परत येत होते. सायंकाळी ७ च्या सुमारास येडूत शिवारात त्यांची मोटार सायकल आली असता अचानक अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील ५ लाख ५५ हजार रूपयाचे ९२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने व त्यांच्या पत्नीजवळील पर्स, मोबाईल जबरीने चोरून नेला.
या घटने संदर्भात २६ डिसेंबरला औंढा नागनाथ पोलिसात संतोष सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (Aundha Crime) अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी.एस.राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरूण नागरे हे करीत आहेत.