औंढा नागनाथ/हिंगोली (Aundha Nagnath Crime) : जिंतूर ते औंढा नागनाथ (Aundha Nagnath Crime) रस्त्याने एका कारमधून अवैध गुटखा विक्री करण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना (Aundha Nagnath Police) मिळताच त्यांनी गोळेगाव फाट्यावर जाऊन कारसह ४ लाख रूपयाचा गुटखा असा एकूण १० लाख ९२ हजार ७०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
गोळेगाव फाट्यावर (Aundha Nagnath Police) पोलिस निरीक्षक गणपत राहिरे, पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे, माधव सूर्यवंशी, दिलीप नाईक, कुटे, तान्हाजी ठाकरे, राजकुमार पोटे, यांच्यासह रावसाहेब काळे, किशन आठवले यांचे पथक ९ जूनला मिळालेल्या माहितीनुसार कारच्या शोधात होते. यावेळी मारोती सुझूकी इको कार क्रमांक एम.एच.३८-ए.डी.६०९३ ही दिसताच तिला थांबविण्यात आले. कारमधील चालक भिमाशंकर विठ्ठल तुपकरी रा.सेलू ता.वसमत, गणपत लक्ष्मण काळे रा.कुरूंदा या दोघांना कारमध्ये काय वस्तू आहे याची विचारणा केली. त्यांनी प्रारंभी उडवा उडवीची उत्तरे दिली असता कारची तपासणी केल्यावर ३ लाख १३ हजार ५०० रूपयाचे राजनिवास गुटख्याचे ३० पोते, ७९ हजार २०० रूपयाचा झेडएल-०१ तंबाखूचे ३० पोते व ७ लाख रूपयाची असा एकूण १० लाख ९२ हजार ७०० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी (Aundha Nagnath Police) औंढा नागनाथ पोलिसात पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिमाशंकर तुपकरी, गणपत काळे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.