औंढा नागनाथ/हिंगोली (Aundha Nagnath) : श्रावणातील दुसऱ्या सोमवारी नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. (Aundha Nagnath) मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते. पोलीस निरीक्षक गणपत राहिरे, देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, पोकाँ माधव सुर्यवंशी यांनी सपत्नीक महापूजा करून दुग्धाभिषेक केल्यानंतर मध्यरात्रीनंतर दोनला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. यावेळी पूजेचे आवर्तने पद्माक्ष पाठक, आबागुरू बल्लाळ, दिनेश पाठक , बंडू पंडित, गौरव पुराणिक, जीवन ऋषी यांनी म्हटली. मराठवाड्यासह परभणी, लातूर, नांदेड, अकोला, वाशिम, यवतमाळ, माहूर, जिंतूर, हिंगोली,पुसद शिवशक्त आले होते.
श्री नागनाथ महाराज की जय’ च्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेले होते. मंदिराचे अध्यक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ बबन सोनुने जगदेव दिंडे देवा देशमुख आदींसह अनेकजण दिवसभर नागनाथ मंदिरामध्ये होते. यावेळी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी (Aundha Nagnath) नागनाथ मंदिरात भक्तासाठी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. याप्रसंगी पोलीस निरीक्षक जी. एस राहीरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार संदीप टाक, पंजाबराव थिटे, यशवंत गुरूवार, गजानन गिरी, अमोल चव्हाण, माधव सूर्यवंशी पोलिस अधिकारी ,पोलीस कर्मचारी, क्यू आर टी पथक, बीडीडीएस पथक यांनी कडक बंदोबस्त दिला होता.