लेखा विभागाच्या कर्मचार्याकडे संशयाची सुई
अधिकारी व कर्मचार्यांचे दणाणले धाबे
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Panchayat Samiti) : येथील पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागाला शॉर्ट सर्किटमुळे रविवार रोजी रात्री आठ वाजे दरम्यान आग लागली. यामध्ये संगणकासह महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक झाली आहेत. औंढा नागनाथ पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून मंगळवारी लेखा विभागाला कुलूप लावून सील करण्यात आले.
औंढा नागनाथ येथील पंचायत समिती विभागात लेखा कार्यालय असून शहरी व ग्रामीण भागाचा विकासाचा लेखाजोखा याच विभागातून चालत असतो पंचायत समिती कार्यालय लेखा विभागातील अनेक दस्तावेज जळून खाक झाली आहेत. या परिसरात लागलेल्या आगीची उलट सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, २ डिसेंबर सोमवारी रोजी दुपारी १ वाजे दरम्यान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस. राहीरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहम्मद शेख, ज्ञानेश्वर गोरे यांनी पंचनामा केला.
यावेळी गटविकास अधिकारी गोपाळराव कल्लारे, सहाय्यक गटविकास अधिकारी बालाजी गोरे, लेखा विभागाचे कर्मचारी इंगोले आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान पंचायत समितीचे कार्यालयाच्या लेखा विभागाला आग लागल्याने संगणकासह इतर महत्त्वाचे दस्तावेज जळाल्यामुळे कार्यालयाच्या परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले. दरम्यान औंढा पंचायत समिती (Aundha Nagnath Panchayat Samiti) लेखा विभागाला आग लागल्याने पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी भेट देऊन पाहणी करून कसून चौकशी चालू असून कार्यालयाला शॉर्ट सर्किटमुळे लागली का कोणता मास्टर म्हणून यामध्ये आहे हे चौकशीतून आता सिद्ध होणार आहे.
दरम्यान, औंढा नागनाथ ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस.राहिरे यांनी लेखा विभागाला सील ठोकले असून कर्मचार्यांकडे संशयाची सुई दिसून येत आहे. लेखा विभागात मागील पाच वर्षात सन २०१९-२० पासून कोट्यावधी रूपयाची रक्कम कपात केली होती. त्या कुठे गेल्या, याचा शोध लावण्यात येणार असून अपहार झाला किंवा नाही, हे चौकशी अंती स्पष्ट होणार आहे. याबाबत गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे यांच्याशी चर्चा केली असता सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून पं.स.चे पूर्ण व्यवहार ऑनलाईन असल्याचे त्यांनी सांगितले. लागलेल्या आगीमुळे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, महावितरणचे अधिकारी, कर्मचार्यांकडून तपासणी झाल्यानंतर निश्चित आग शॉटसर्कीटने लागली की लावली याची तपासणी केली जाणार आहे.