औंढा नागनाथ/हिंगोली (Aundha Nagnath Police) : औंढा नागनाथ येथील पोलीस (Aundha Nagnath Police) ठाण्यातील इमारतीच्या छताचे प्लॅस्टर बुधवारी दिनांक ५ जून रोजी सायंकाळी अचानक कोसळले ही घटना घडली त्यावेळी पोलीस कर्मचारी बाहेर असल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. (Aundha Nagnath) औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्याच्या कारभार अत्यंत जीर्ण झालेल्या निजामकालीन इमारतीतून चालतो, तसेच त्यांनतर बांधकाम करण्यात आलेल्या इमारती सह (Police Colony) पोलीस वसाहतीचे बांधकाम जुने असल्यामुळे इमारतीच्या भिंती व छता मध्ये पाणी झिरपून इमारती अत्यंत कमकुवत झाल्या आहेत.
गत काही वर्षांपासून पोलीस ठाण्याची मुख्य इमारत धोकादायक असल्याचे बांधकाम विभागाकडून कळविण्यात आल्या नंतर ही इतरत्र व्यवस्था नसल्यामुळे त्याच (Police Colony) इमारतीतून कारभार चालविला जात आहे. जीर्ण झालेल्या इमारती व अपुऱ्या जागेमुळे गुन्हेगारांच्या विविध दस्तावेजा सह पोलीस हत्यारे ठेवण्यास सुद्धा जागा उपलब्ध नसल्याचे कळते, त्यातच बुधवारी सायंकाळी दरम्यान (Aundha Nagnath Police) पोलीस ठाण्यातील एका इमारतीच्या छताचे प्लास्टर अचानक कोसळले, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी नेमके बसायचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
छताचे प्लास्टर कोसळले तेव्हा कर्मचारी तेथे नव्हते ते कामासाठी बाहेर होते आणि काही क्षणातच त्या रूमच्या छताचे प्लास्टर कोसळले.कामासाठी बाहेर गेल्यामुळे सुदैवाने कुणासही इजा पोहचली नाही.त्या रुममधील कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. जीर्णावस्थेत असलेल्या निजामकालीन इमारतीत असलेले पोलीस निरीक्षक यांचे कार्यालय कालच्या घटनेमुळे स्थलांतरित करून येथील महिला समुपदेशनासाठी असलेल्या इमारतीत हलविण्यात आले आहे. त्यामुळे तात्पुरती व्यवस्था झाली असली तरी, (Aundha Nagnath Police) पोलीस ठाण्यातील इतर कामकाजासाठी व पोलिसांचे निवासस्थान असलेल्या वासहतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, त्यामुळे पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसह वसाहतीचे बांधकाम करणे आवश्यक आहे.