बसस्थानक परिसरातील विहिरीवरील विद्युतपंप जळाले
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Water supply) : येथील शहराला पाणीपुरवठा करणारा बसस्थानक परिसरातील विहिरीवरील विद्युत पंप अचानक जळाल्याने सदरील पंप दुरुस्ती अनुषंगाने औंढा नागनाथ शहरास तीन दिवस पाणीपुरवठा बंद (Aundha Nagnath Water supply) राहणार असल्याने शहरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दिनांक एक एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान करण्यात आले आहे.
याबाबत नगरपंचायत कडून शहरात ऑटो फिरवून नागरिकांना कळविण्यात येत आहे विद्युत पंप दुरुस्त झाल्यानंतर तात्काळ शहराला (Aundha Nagnath Water supply) पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नगर प्रशासनाकडून देण्यात आली आहे




