औसा (Ausa Death case) : औसा तालुक्यातील खानापूर तांडा शिवारात विद्युत प्रवाह चालू असलेल्या डीपीवर चढलेल्या एका तरुणाचा डीपीवरून खाली पडून मृत्यू (Ausa Death case) झाला. दरम्यान डीपीवरून खाली पडल्यानंतर तेथे उपस्थित असलेला शेतमालक पळून गेल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह मालक असलेल्या औसा येथील पेट्रोल पंपावर आणून ठिय्या दिला. जोपर्यंत संबंधितावर कारवाई होत नाही व मालक नुकसान भरपाई देत नाही; तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका मृताच्या नातेवाईकांनी घेतली.
याबाबत माहिती अशी की, पावसाळ्यातील गंगाही पेट्रोल पंपाचे मालक कावळे यांच्याकडे पप्पू नीलू राठोड हा ३६ वर्षीय तरुण कामाला होता. तो पेट्रोल पंपाच्या गाडीचा चालक म्हणून कावळे यांच्याकडे काम करत होता. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास मालक कावळे हे पप्पू राठोड यास घेऊन खानापूर तांडा शिवारातील आपल्या शेतात डीपीवरून विद्युत प्रवाह जोडण्यासाठी गेले. राठोड यास त्यांनी डीपीवर चढविले. मात्र पप्पू राठोड डीपीवरून खाली पडला. यावेळी (Ausa Death case) तेथे उपस्थित असलेल्या मालक कावळे यांनी राठोड यास मदत न करता पळ काढला, असा आरोप मयत पप्पू राठोड याच्या नातेवाईकांनी केला. त्याला मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता, असा दावाही नातेवाईकांनी केला.
दरम्यान मयत पप्पू राठोड याचा मृतदेह संतप्त नातेवाईकांनी कावळे यांच्या पेट्रोल पंपावर आणून ठेवला. जोपर्यंत पप्पू राठोड यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळत नाही; तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, अशी भूमिका घेत (Ausa Death case) नातेवाईकांनी ठिय्या दिल्याने गोंधळ उडाला. दरम्यान तेथे (Ausa Police) पोलीस दाखल झाले असून याबाबत पुढील कार्यवाही केली जात आहे. मयत पप्पू राठोड यांच्या पश्चात पत्नी व चार मुले असे कुटुंब असल्याचे यावेळी नातेवाईकांनी सांगितले.