महसूल कर्मचाऱ्यांचा संप विद्यार्थी-पालकांच्या मुळावर
औसा (Revenue Department Andolan) : सुधारित आकृतीबंध कर्मचारी कपात न करता लागू करावा, यासह अनेक मागण्यांसाठी दि.१५ जुलैपासून महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असून यामुळे (Tehsil Office) तहसील कार्यालय ठप्प झाले आहे. संपामुळे तालुक्यातील हजारो विविध प्रमाणपत्र ‘मंजुरीविना’ प्रलंबित पडली असल्याने हा संप शैक्षणिक कामांसाठी कागदपत्रे मागणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या मुळावर आला आहे.
औसा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सोमवारपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले असल्यामुळे तहसील कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. त्यातच विद्यार्थी आणि पालक यांच्या करिता लागणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागद पत्रासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर केले आहेत.
परंतु, महसूल कर्मचाऱ्यांचा संपामध्ये सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी यांची कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तत्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावेत. (Revenue Department) महसूल विभागाचा आकृतिबंध तत्काळ मंजूर करुन पुरवठा विभागातील पदभरतीमुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर काढण्याबाबत तत्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी आंदोलनात कर्मचारी सहभागी आहेत.
ऑनलाईन सेवेचा बोजवारा आणि सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तालुक्यातील हजारो विद्यार्थी पालकांचे प्रस्ताव रखडले आहेत. सर्व्हर डाऊन आणि महसूल कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप विद्यार्थी आणि पालकांच्या मुळावर आला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र व विविध कागदपत्रासाठी रितसर अर्ज करूनही संप आणि सर्व्हर डाऊन मुळे तहसिल कार्यालयात कुठलेच कामकाज होत नसल्यामुळे नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. (Revenue Department) महसूल कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन कर्मचाऱ्यांचा संप तातडीने निकाली काढून जनतेची होत असलेली गैरसोय टाळावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
‘सर्व्हर स्लो’ झाल्याने गैरसोय
शासनाने जेव्हापासून मुख्यमंत्री-लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे, तेव्हापासून सर्व्हर स्लो झाले आहे. उत्पन्न, रहिवाशी, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, ईडब्ल्यूएस, अल्पभूधारक, भूमिहिन, नॉनक्रिमीलियर, जात व ऐपत प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र रखडले आहेत. या (Revenue Department) आंदोलनाचा चांगला फटका विद्यार्थ्यांसह अनेकांना बसला आहे. उत्पन्न, रहिवाशी, वय व अधिवास, राष्ट्रीयत्व, ईडब्ल्यूएस, नॉनक्रिमीलिअर, अल्पभूधाकर, भूमिहिन, जात व ऐपत प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्र रखडली आहेत. जवळपास पंधरा दिवसापासून दस्त सर्व्हर स्लो झाले आहे. मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना अंमलात आल्यापासून सर्व्हर स्लो झाल्याने आतापर्यंत तालुकास्तरावर हजारो प्रमाणपत्र रखडली आहेत.