India vs Australia :- भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) 2024-25 च्या चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला आहे. चौथ्या दिवसाच्या खेळात कांगारू संघाच्या शेवटच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. कांगारू संघाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या आहेत. कांगारू संघाने भारतावर एकूण 333 धावांची आघाडी घेतली होती. तत्पूर्वी, नितीश रेड्डी 114 धावा करून बाद झाला. भारतीय संघाचा पहिला डाव 369 धावांवर संपला. त्याचवेळी कांगारू संघाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात भारताला ३४० धावांचे लक्ष्य होते, धावांचा पाठलाग करत भारतीय संघाने सर्वबाद १५५ धावा करू शकला व भारतीय संघाला १८४ धावांनी पराभूत करत २-१ अशी आघाडी मिळाली.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी कसोटी प्लेइंग इलेव्हन:
भारत- यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टॅन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.