कारंजा(Washim) :- दारव्हा रस्त्यावरील सोमठाणा गावाजवळील उंबर्डा बाजारकडे जाणाऱ्या वळणावर ऑटो व मोटारसायकलची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर तीन जण जखमी (Injured) झाले आहेत. ही घटना २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.
ऑटो व मोटारसायकलची समोरासमोर धडक
प्राप्त माहितीनुसार, प्रवासी ऑटो सोमठाणा येथून उंबर्डा बाजार येथे जात असताना कारंजाहून दारव्हा गावाच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकल सोबत समोरासमोर धडक (strike) झाली. या घटनेत श्रीकांत विजय इंगोले (२८, रा.तरनोळी) , ऑटो चालक गजानन बाबुलाल चव्हाण (४५, सोमठाणा) , सिद्धार्थ पांडूरंग भगत (५५, सोमठाणा), योगेश राठोड (२४ ) हे जखमी झाले. त्यांना रुग्णसेवक(patient attendant) अनिकेत भेलांडे, अजय घोडेस्वार यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात(hospital) आणले होते. याठिकाणी सिद्धार्थ भगत मृत झाले. दोघांना पुढील उपचारासाठी बाहेरगावी पाठवण्यात आले असून, एक अपघातग्रस्त येथे उपचार घेत आहे.