परभणी/ताडकळस (Parbhani):- येथून जवळच असलेल्या माखणी येथील १७ वर्षीय विद्यार्थीनीने स्वत:च्या घरात पत्र्याखाली लावलेल्या लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवार ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास घडली. या प्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (Death)नोंद करण्यात आली आहे. सलग दुसर्या दिवशी आत्महत्येची दुसरी घटना घडली आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मच्छिंद्र मधुकर गाडे यांनी खबर दिली आहे. त्यांच्या बहिण कु.वैष्णवी मधुकर गाडे वय १७ वर्ष हीने रविवारी दुपारी अज्ञात कारणाने आत्महत्या (suicide) केली. घटनेची माहिती मिळताच सपोनि. गजानन मोरे, पोउपनि. गजानन काठेवाडे, बिट जमादार गणेश लोंढे, भगवान चोरघडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्रात(Health Centers) वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम चव्हाण, डॉ.अश्विनी कोल्हे यांनी शवविच्छेदन(Autopsy) केले. ताडकळस पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.