शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयप्रकाश दांडगावकरांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
वसमत/ हिंगोली (Mahavikas Aghadi Jayant Patil) : भारतीय जनता पार्टीने गैरमार्गाचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे पक्ष फोडल्याने जनता संतप्त आहे. त्यामुळे लोकसभेत महायुतीचा पराभव झाला लोकभावना महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि आता आपली सत्ता जाणार म्हणून सरकार वाटेल त्या घोषणा करत आहे. सरकारच्या तिजोरीतून योजनांच्या जाहिरातीसाठी खर्च होत आहे महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाहण्यास वेळ नाही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले वसमत येथे शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या नेतृत्वाखाली वसमत येथे शनिवारी रात्री शिवस्वराज्य यात्रा दाखल या यात्रेचे वसमत येथे जंगी स्वागत झाले प्रचंड संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी व तालुक्यातील नागरिक ग्रामस्थ सभेसाठी उपस्थित होते. वसमत येथे पार पडलेल्या या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर , माजी आमदार पंडितराव देशमुख,तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड, उपतालुकाप्रमुख सत्यनारायण बोखारे, शहराध्यक्ष शेख आयुब, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या जाहीरसभेसाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयप्रकाश दांडेगावकर यांनी एकप्रकारे शक्ती प्रदर्शन केल्याचे चित्र समोर आले
सभेत बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचे सांगून मनोज जरांगे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्या, मनोज जरांगे वाशी पर्यंत गेले वाशीत झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांचे समाधान केले त्यानंतर मनोज रंगे परत आले दोघांमध्ये काय चर्चा झाली. त्याचा तपशील आम्हाला माहित नाही मात्र मनोज जरंगे यांनी सांगितलेल्या चर्चा सरकारने मान्य केल्या तर त्याला पाठिंबा देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत निर्णय सरकारला घ्यायचा आहे.
या संदर्भात सरकारने घेतलेला निर्णय राष्ट्रवादीला मान्य राहील. अशा शब्दात जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणा संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. यावेळी खासदार अमोल कोल्हे युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे तर प्रास्ताविक तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड यांनी केले कार्यक्रमयशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष दौलत हुंबाड, उपतालुकाअध्यक्ष सत्यनारायण बोखारे, शहराध्यक्ष शेख आयुब यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले.
शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने दांडेगावकर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरून जयप्रकाश दांडेगावकर यांनी आमदार राजू पाटील नवघरे यांच्यावर बोचरी टीका केली विधान परिषदेच्या निवडणुकीपर्यंत नवघरे परत येतील अशी मला अपेक्षा होती. मात्र तसे घडले नसल्याचे त्यांनी सांगितले वसमत विधानसभा मतदारसंघात कोणतीही विकासाचे कामे झाली नाहीत अशा शब्दात दांडेगावकर यांनी टीका केली. वसमत मतदारसंघाचे गेलेले वैभव प्राप्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तरुणाईला संधी द्यावी म्हणून आपण 2019 मध्ये संधी दिली मात्र आता मतदारांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मैदानात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले.