नवी दिल्ली (Ayodhya Ram mandir) : दुबई, न्यूयॉर्क आणि दिल्ली एनसीआरसारख्या जगभरातील गजबजलेल्या भागात मोठमोठे समारंभ करून द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाने (The House of Abhinandan Lodha) अयोध्येत सामावलेली (Ayodhya Ramlala) प्रचंड क्षमता दाखवून दिली आणि राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेल्या अयोध्येच्या उज्ज्वल, आशावादी भविष्यात जागतिक सहभागास आमंत्रण दिले. जगभरातील भारतीयांना त्यांच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित करून या समारंभांनी जागतिक आध्यात्मिक राजधानी म्हणून (Ayodhya Ram mandir) अयोध्येचे स्थान आणखी मजबूत केले.
ही जागतिक चळवळ अयोध्येला जागतिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र बनवण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेस अनुरूप आहे. मोठमोठ्या स्थळी अयोध्येच्या समृद्ध परंपरेचा प्रसार करून द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाने( The House of Abhinandan Lodha) या शहराची लक्षणीयता आणि तेथील विकासाची क्षमता अधोरेखित केली.
या समारंभांच्या वैशिष्ट्यांमध्ये दुबई फ्रेम या जगातील सर्वात मोठ्या, 150 मीटर उंच फ्रेमवर एक आकर्षक देखावा सामील आहे. दुबई फ्रेम हे दुबईमधील एक अत्यंत प्रसिद्ध शिल्प आहे आणि भूतकाळ आणि वर्तमानातील सेतूचे ते प्रतीक आहे. त्यामुळे (Ayodhya Ramlala) अयोध्येच्या परंपरेचा गौरव करण्यासाठी हे स्थान उचित होते. दुसरीकडे, न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये एक आकर्षक व्हिडिओ डिस्प्ले आणि ऑन-ग्राउंड अॅक्टिव्हेशनद्वारे भविष्याची नांदी देत अयोध्येचा वारसा न्यूयॉर्क शहराच्या थेट मध्यात आणला आणि अयोध्येचे वैभव जगभरातील लोकांना दाखवले. त्याशिवाय दिल्ली एनसीआरचे आकाश एका नेत्रदीपक ड्रोन शो ने झळकून उठले, ज्याच्या माध्यमातून अयोध्येची ऐतिहासिक आणि आध्यात्मिक लक्षणीयता साजरी करत असताना प्रगती, नावीन्य आणि परंपरा यांचे दर्शन घडले.
द हाऊस ऑफ अभिनंदन लोढाचे (The House of Abhinandan Lodha) अध्यक्ष डॉ. अभिनंदन लोढा म्हणाले, “या जागतिक प्रदर्शनातून देशविदेशातील भारतीयांना अयोध्येत जमीन खरेदी करण्याची आणखी एक संधी आम्ही देत आहोत, कारण जानेवारी 2024 मध्ये 1.6 मिलियन चौरस फूट प्लॉटिंग केलेली जमीन अवघ्या 48 तासांत ग्राहकांनी खरेदी केल्यामुळे बऱ्याच लोकांची संधी तेव्हा हुकली होती. आम्ही जगभरातील भारतीयांना अयोध्या येथे जमिनीत गुंतवणूक करून आपल्या भूतकाळाचा गौरव करणारा आणि भविष्याची उभारणी करणारा वारसा निर्माण करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. जागतिक (Ayodhya Ramlala) आध्यात्मिक राजधानी म्हणून अयोध्येला यथोचित सन्मान मिळवून देण्याचे आमचे ध्येय आहे आणि आज त्या दिशेने आम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.”