आ. संजय कुटे यांच्या आग्रही मागणीला यश…
बुलढाणा (Ayurvedic Medical College) : केंद्रीय आयुषमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या पुढाकारातून व जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे (MLA Dr. Sanjay Kute) यांच्या पाठपुराव्यातून जळगाव जामोद तालुक्यातील मौजे वायाळ येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन (Ayurvedic Medical College) शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित 100 रुग्ण खाटांचे शासकीय आयुर्वेद रुग्णालय मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. रुग्णालय व महाविद्यालय स्थापनेचा एकूण 487 कोटी रुपये खर्च येणार असून (Ayurvedic Medical College) रुग्णालय व महाविद्यालयाची उभारणी होणार आहे. यासाठी आ. संजय कुटे (MLA Dr. Sanjay Kute) यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता, हे विशेष !
डॉक्टरांची कमतरता भरुन काढण्यासाठी तसेच गोरगरीब विध्यार्थ्यांना माफक दरात वैदयकीय शिक्षण प्राप्त करून देण्यासाठी शासन निर्णयानुसार जळगाव जामोद तालुक्यातील मौजे वायाळ येथील आवश्यक व सुयोग्य जागा (किमान ५ एकर) निश्चित करुन सदर जागा महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी, जिल्हा बुलढाणा यांच्यामार्फत निःशुल्क उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच सदर जागेत नवीन शासकीय आयुर्वेद महाविद्यालय (Ayurvedic Medical College) व रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महाविद्यालयासाठी विविध संवर्गातील 596 पदे भरण्यास परवानगी मिळाली आहे. महाविद्यालयाशी संलग्नित आयुर्वेद रुग्णालयासाठी विविध संवर्गातील पदे अंदाज पत्रकीय तरतूद करुन विहित मार्गाने निर्माण करण्यास व पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Ayurvedic Medical College) महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अनुषंगिक बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास देखील मंजुरी देण्यात आली आहे. तसा शासन निर्णय बुधवार 9 ऑक्टोबर रोजी निर्गमित झाला आहे.