अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांना आयुष मंत्र्यांची भेट
बुलढाणा (Prataprav Jadhav and Ayurvedic treatment) : सर्वसामान्य जनता आता आयुर्वेद उपचार पद्धतीला पसंती देत आहे. लोकाचा विश्वास आयुर्वेदिक पद्धतीवर बसला आहे. या उपचार पद्धतीचा अधिक विकसित करून तिचा प्रचार प्रसार करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी व्यक्त केले.
दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांच्या वतीने पाण्डुलिपी इकाई (मेनु स्क्रिप्ट म्युझियम) चे उद्घाटन 30 ऑगस्टला आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आयुर्वेद ही आपली प्राचीन चिकित्सा पद्धती आहे या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार पाहिजे त्या प्रमाणात झाला नव्हता. पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने आयुष मंत्रालयाची स्थापना केली, आणि (Ayurvedic treatment) आयुर्वेद चिकित्सा प्रणाली नवीन दिशा देण्याचं काम केले.
आयुर्वेद ही भारताची प्राचीन चिकित्सा प्रणाली आहे. तिचे ज्ञान जतन करून अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून 17 ऑक्टोंबर 2017 ला अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांची स्थापना करण्यात आली, आता पर्यंत 26 लाखापेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या आयुर्वेदिक उपचार केल्या गेले. गेल्या सात वर्षांमध्ये अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थाने महत्वपूर्ण प्रगती केली असून वैश्विक स्तरावर ज्ञान संपादन करणारे हे (Ayurvedic treatment) आयुर्वेदिक संस्थान प्रमुख केंद्र बनले आहे, अशी माहिती ना. प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांचे निदेशक डॉ. तनुजा, उपमहा निदेशक सत्यजित पॉल एआयआय. चे प्रमुख डॉ. महेश व्यास डॉ. आनंद शर्मा, महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक सोहम वायाळ उपस्थित होते. अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांच्या निदेशिका डॉ. तनुजा यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचे सांगत (Ayurvedic treatment) अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थांच्या वतीने केल्या जात असलेल्या कामकाजाची माहिती दिली.
17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान आंतरराष्ट्रीय आयुर्वेदिक (Ayurvedic treatment) संमेलन होणार आहे. या संमेलनाची “आरोह 2024” या पुस्तिकेचे मुखपृष्ठ प्रकाशन हे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. त्यानंतर मंत्री महोदयांनी धन्वंतरी वाटिका व दवाखान्याचीही पाहणी केली. या कार्यक्रमाला अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्थान मधील प्राध्यापक डॉक्टर व संशोधक उपस्थित होते.