राज्याच्या अर्थसंकल्पात बुलढाणा जिल्ह्यासाठी आयुर्वेद महाविद्यालय मंजूर
बुलढाणा (Prataprav Jadhav) : केंद्रीय राज्यमंत्री म्हणून आयुष मंत्रालयाचा (AYUSH Ministry) स्वतंत्र प्रभार हाती घेताच, महाराष्ट्रात प्रथमच आल्यानंतर मुंबई येथे (Prataprav Jadhav) ना. प्रतापराव जाधव यांनी राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांना बुलढाणा जिल्ह्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे पत्र दिले होते. त्याच पत्राची दखल घेत आज शुक्रवार 28 जून रोजी विधिमंडळात मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात बुलढाणा जिल्ह्यासाठी (Govt Ayurveda College) शासकीय आयुर्वेद महाविद्यालय मंजूर करण्यात आले. आयुष मंत्री म्हणून (Prataprav Jadhav) प्रतापरावांची ही दमदार ओपनिंग ठरली !
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्प मांडताना ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ना.प्रतापराव जाधव (Prataprav Jadhav) आयुष व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांनी राज्य शासनाला प्रस्ताव पाठविण्यासंबधी पत्र दिले होते. (Govt Ayurveda College) आयुर्वेद महाविद्यालय मंजूर करा, या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ना. प्रतापराव जाधव, आ. संजय गायकवाड, आ. डॉ संजय रायमूलकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली होती. त्याची फलश्रुती पहिल्याच अर्थसंकल्पात बघायला मिळाली, हे येथे विशेष !