रुग्णांचे हाल; वरिष्ठ अधिकार्यांनी लक्ष देण्याची गरज…!
परभणी/पालम (Ayushman Arogya Kendra) : पालम तालुक्यातील मौजे रावराजूर येथील (Ayushman Arogya Kendra) आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्यांच्या मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. अधिकारी व कर्मचारी हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना वठीस धरत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांतून होत आहेत. याबाबत वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रावराजूर येथील (Ayushman Arogya Kendra) आयुष्मान आरोग्यवर्धिनी केंद्रात दररोज येणार्या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र वैद्यकिय अधिकार्यांसह कर्मचारी कधीच वेळेवर येत नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना प्रतिक्षा करत बसावे लागते. कर्मचारी आलेच तर ओपीडी लवकर चालू करणे, रुग्णांच्या राहण्याची व्यवस्था न करणे, अपमानास्पद वागणूक देणे असे प्रकार सर्रास सुरु असतात. वैद्यकिय अधिकारी उशीरा येत असल्याने कर्मचार्यांवर त्यांचा वचक नाही.
वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांना अन्य वाहनांचा वापर करून गंगाखेड, पालम गाठावे लागते. वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रारी करूनही ते लक्ष देत नाहीत. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांची मनमानी सुरु आहे. रुग्णांना वठीस धरत असल्याने गावकर्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन संबंधित (Ayushman Arogya Kendra) आरोग्य केंद्राचा होणारा मनमानी कारभार थांबवावा व रुग्णांच्या होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.