नगर पालिका प्रशासनाचा पुढाकार
कळमनुरी (Ayushman Card) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड (Ayushman Card) लाभार्थ्यांना कळमनुरी नगरपालिकेच्या वतीने दि.१५ फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कळमनुरी नगरपालिका कार्यालयात व उपजिल्हा रुग्णालय येथे (Ayushman Card) आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची जनजागृती व लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड वाटप शिबिराचे आयोजन दि.१५फेब्रुवारी रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते या शिबिरात १९२ पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्डचे वाटप नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांच्या हस्ते करण्यात आले. दि.१६ फेब्रुवारी रोजी शहरातील गुलाब नबी आझाद स्कूल येथे व दि.१७ फेब्रुवारी रोजी नुरी मोहल्ला येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र व उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी आणि दि.१८ फेब्रुवारी रोजी कळमनुरी शहरातील इंदिरानगर येथील शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी रविराज दरक यांनी दिली आहे.
हे (Ayushman Card) शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरपालिकेचे आनंद दायमा, निकेत यरमळ, श्रीमती कृष्णा कोळपे, जयश्री निमसटकर, सविता कुटे, महादेव शिंदे,सुभाष काळे,मनोज नकवाल,तालुका आरोग्य अधिकारी अमोल सूर्यवंशी, शेख नसीर, गोपाल जटाळे,विकास थोरात, सुदर्शन तावडे,विनायक गाडेकर,अमर सोनुने, सुरज देशमाने,प्रकाश धुळे, संकेत भुसारे आदींनी परिश्रम घेतले.
शहरभरात आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी शिबिर सुरू ठेवणार : रविराज दरक
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड (Ayushman Card) हे गोरगरीब जनतेसाठी अत्यंत उपयोगी असून आयुष्यमान कार्ड हे राज्याबरोबर इतर राज्यातल्या रुग्णालयातही पाच लाख रुपयापर्यंत औषधोपचार मोफत होणार आहे परंतु शहरातील अनेक गोरगरीब जनतेला या योजनेची माहिती नसल्याने त्यांचे आयुष्यमान कार्ड काढून त्यांना या योजनेचा फायदा व्हावा या उद्देशाने कळमनुरी नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमानाने शहरात विविध भागात शिबिर आयोजित करून आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. याचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कळमनुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी रविराज दरक यांनी केले आहे.