मुंबई (Baba Siddiqui case) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील विशेष न्यायालयाने अनमोल लविंदरसिंग बिश्नोई उर्फ एबी भाई यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) विशेष न्यायाधीश बी.डी. शेळके यांनी पोलिसांनी केलेल्या युक्तिवादानंतर हा निकाल दिला. आरोपी (Anmol Bishnoi) अनमोल बिश्नोईच्या सहभागाबाबत पुरेसे पुरावे उपलब्ध असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे की, “एसीपी किशोरकुमार शिंदे आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, आरोपपत्र आणि तपास कागदपत्रे पाहिल्यानंतर मी असे म्हणू शकतो की, आरोपी (Anmol Bishnoi) अनमोल बिश्नोईच्या या प्रकरणात सहभागाबाबत पुरेसे पुरावे आहेत. या आदेशात असेही म्हटले आहे की, बिश्नोईने अटक केलेल्या आरोपींना शस्त्रे पुरवली होती.
न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, अटक टाळण्यासाठी आरोपी फरार असल्याने अमेरिकेतील संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याच्या हद्दपारीची मागणी करण्यात आली आहे. आरोपी अनमोल बिश्नोईला (Anmol Bishnoi) अमेरिकेच्या ताब्यात देण्याची विनंती अमेरिकन अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. तो अद्याप सापडलेला नाही आणि अटक टाळण्यासाठी फरार आहे, असे आदेशात म्हटले आहे.
आरोपपत्रात 26 आरोपींची नावे
या प्रकरणातील आरोपपत्रात एकूण 26 आरोपींची नावे आहेत. ज्यामध्ये मोहम्मद यासीन अख्तर, शुभम रामेश्वर लोणकर आणि अनमोल लविंदरसिंग बिश्नोई (Anmol Bishnoi) यांचा समावेश आहे. (Baba Siddiqui case) बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी झीशानचा जबाब नोंदवला. झीशानने पोलिसांना सांगितले की, तो संध्याकाळी 6 वाजता त्याच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता आणि (Baba Siddiqui case) बाबा सिद्दीकी संध्याकाळी 7 वाजता ऑफिसमध्ये पोहोचले होते. रात्री 9 वाजता झीशानला भूक लागली, तेव्हा त्याने त्याच्या वडिलांना सांगितले की तो 10-15 मिनिटांत आत येईल.
दरम्यान, एका पक्षाच्या कार्यकर्त्याने झीशानला सांगितले की, त्याच्या वडिलांना गोळी लागली आहे आणि त्यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आले आहे. झीशानने रुग्णालयात पोहोचून त्याची आई आणि बहिणीला माहिती दिली. तिथे पोहोचल्यावर त्यांना सांगण्यात आले की, (Baba Siddiqui case) बाबा सिद्दीकी यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे, जिथे नंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.