ब्रम्हपुरी (Pregnant woman Torture) : घरासमोर मंच्युरियन स्टॉल लावण्यावरून झालेल्या वादात आरोपींनी एका गर्भवती महिलेच्या पोटावर लाथा, बुक्यांनी मारहाण केल्याने पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे संपुर्ण ब्रम्हपुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या (Pregnant woman Torture) प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा सचिन लोणारकर (२९) असे पिडीत महिलेचे नाव आहे. तर आरोपींमध्ये राकेश मरस्कोल्हे, ममता मरस्कोल्हे, गोलू मरस्कोल्हे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीतेचा पती आरोपींच्या घरासमोर मंच्युरियन स्टॉल लावत होता. (Pregnant woman Torture) आरोपीने स्टॉल लावण्साठी रोखले पण सचिनने ऐकले नाही. यामुळे दि. २७ मे रोजी रात्री ८.३० वाजता त्यांच्यात भांडण झाले. यात पतीला मारहाण सुरू असल्याने पतीला वाचवण्यासाठी पुजा गेली असता आरोपींनी तिलाही लाथा बुक्यांनी मारहाण केली.
या मारहाणीत पुजाच्या पोटाला लाथ लागल्याने तिला असह्य वेदना होऊ लागल्या, लगेच तिला ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. (Pregnant woman Torture) पूजाच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. आरोपीच्या तक्रारीवरून पूजाचा पती सचिन विरुद्धही मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




