परभणी (Parbhani) :- जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १६.७ मिलीमीटर पावसाची(Rain) नोंद झाली आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक ५५.६ मि.मी. पाऊस पडला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३९४.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
परभणी शहरातील रस्ते बनले चिखलमय
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. परभणी ६.५ (३८२.४), गंगाखेड ३०.८ (५३१.७), पाथरी १५.२ (३६०.१), जिंतूर १२.९ (४४८.८), पुर्णा १५.६ (४०६.७), पालम ५५.६ (४९६.७), सेलू ४.४ (३८१.४) सोनपेठ १० (४१३.५) आणि मानवत तालुक्यात १० (३९४.९) पाऊस पडला आहे. जिल्ह्यात १ जून आतापर्यंत सरासरी ३९४.९ मिलीमीटर पाऊस पडला आहे. परभणी शहरातील रस्ते आधीच खराब, त्यात सुरु असलेल्या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्ते चिखलमय बनले आहेत. मात्र मनपा (Municipality)प्रशासन कोणत्याही उपाय योजना राबवत नाही.