काँग्रेस ,शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आंदोलनात सहभाग
अमरावती (Badlapur Harassment Case) : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिरात शिकणा-या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील एका नराधम कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या ()e अमानवी कृत्याविरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात महिला आणि मुलींवर अत्याचार सुरु आहेत. सरकार आणि पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. महिला मुलींना सुरक्षित वातावरण देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घटनेचा केला निषेध
बदलापूरच्या या (Badlapur Harassment Case) घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. त्यासोबतच अमरावती शहरामध्ये प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने जनतेवर अवाढव्य प्रॉपर्टी टॅक्स लादलेला आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर फार मोठा बोजा पडलेला आहे. हा प्रॉपर्टी टॅक्स ही परत घ्यावी आमची मोठी मागणी आहे. म्हणून आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मार्फत शहरातील महिलांवरील अत्याचार आणि महिला सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा करून या असंवेदनशील सरकारविरोधात दि.२४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:३० पासून ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत निषेध निदर्शने करण्यात आली.मा.हायकोर्टाच्या आदेशाचे पालनकरून महाराष्ट्र बंद/अमरावती बंद हा कार्यक्रम रद्द करण्यात आलेला होता मात्र त्या ऐवजी पूर्वनियोजित निदर्शनांचा कार्यक्रम अंशतः बदल करून राजकमल चौक येथे निषेध प्रदर्शने केली.
सकाळी १०.३० वा पासून ते दुपारी १२:०० वाजे पर्यंत काळे वस्त्र परिधान करून आणि काळ्या पट्ट्या बांधून निषेध निदर्शने महाविकास आघाडीच्या वतीने राजकमल चौक येथे मौन पाळून धरणा देण्यात आला होता. (Badlapur Harassment Case) याप्रसंगी प्रामुख्याने जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे, जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष ग्रामीण बबलु देशमुख, माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख,शहराध्यक्ष बबलु शेखावत,माजी खासदार अनंतराव गुढे, माजी महापौर विलास इंगोले,शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे,प्रदेश प्रवक्ते दिलीप एडतकर,माजी महापौर मिलिंद चिमोटे,शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे,शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी,माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील,शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख प्रीती बंड,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हेमंत देशमुख,राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षा संगीता ठाकरे,म.प्र.काँ.उपाध्यक्ष भैय्या पवार,महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, म.प्र.काँ.महासचिवकिशोर बोरकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख,शिवसेना विभागीय सचिव सागर देशमुख,कोमल बोथरा,संजय वाघ,आनंदबाबु भमोरे,बाळासाहेब भुयार,सचिन हिवसे,नितीन कदम,प्रशांत वानखडे,हाजी नजीर खान,अभिनंदन पेंढारी, डॉ.सुजाता झाडे,शोभा रविंद्र शिंदे,वंदना थोरात,अनीला काझी,शिरीन खान,किर्तीमाला चौधरी,शीतल देशमुख,मंदा कदम,सरला इंगळे,संगीता देशमुख,मैथिली पाटील,छाया कडू,सुवर्णा धावडे,कल्पना वानखडे,ज्योती बावीसकर,ममता हुतके,विभा गौरखेडे,आशा अघम,शिल्पा राऊत,अपर्णा मकेश्वर,मनाली तायडे,कल्पना शेवतकर,वैशाली विधाते,नंदा मराठे,अनिता पारसे,रफिकभाई चिकुवाले,प्रमोद पांडे,गजानन राजगुरे,राजा बांगडे,विक्की वानखडे,गुड्डू हमीद,राजीव भेलें,मतीन अहेमद,सतीश मेटांगे,अजय कुबडे,अमर देशकर,प्रदीप अरबट,विजय बर्वे,प्रदीप शेवतकर,डॉ.मतीन अहेमद,सुनील साधनकर, प्रा.बी.टी.अंभोरे,प्रा.किशोर देशमुख,अजय कुबडे,मोहम्मद साबीर,सुरेश इंगळे,शरद ठोसरे,गजानन इंगोले,मोहन पुरोहित,सचिन निकम,बिलाल खान,विजय आठवले,लखन यादव,रोहन चिमोटे,संकेत साहू,विकास धोटे,जूबैर खान,विजय वानखडे,सुनील जावरे,गोपाल धरमाळे,गजानन जाधव,संदेश सिंघई,सुरेश धावडे, रिज्जु भाई,इस्रार आलम,विजय राठोड,विकास धोटे,नाना बारबुद्धे,शुभम शेगोकार,वेदांत उगले,अमित गावंडे,विशाल बोरखडे,ॲड.धनंजय तोटे,अभिजित धर्माळे,सतीश चापे,गिरीश चौधरी,किशोर देशमुख,अजीम भाई, विजय राठोड यांच्या सह महाविकास आघाडीचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यामध्ये महिलांना लाडकी बहीण म्हणणाऱ्या या शासनाने आधी या लाडक्या बहिणीची सुरक्षा जपायला हवी, महाराष्ट्रात बदलापूर नंतर अनेक घटना महिलांवरील (Badlapur Harassment Case) अत्याचाराच्या घडलेल्या आहेत, मुलींवरील देखील अत्याचाराच्या घटना अलीकडे वाढलेले आहेत ,त्यामुळे शासनाने त्यांची सुरक्षा अधी करावी ,अन्यथा आम्ही त्यांच्याकरिता रस्त्यावर होतो.
– बबलू देशमुख ,जिल्हाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी