पुसद (Badlapur Harassment Case) : बदलापूर येथील दोन शाळकरी मुलींवर अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी व राज्यात महिलांवर होत असलेले अत्याचार त्वरित थांबविण्यात यावेत या मागणीचे निवेदन राज्यपाल यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील महाविकास आघाडीच्या वतीने दि. 24 ऑगस्ट रोजी देण्यात आले. तहसील परिसरातील जयस्तंभ जवळ महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार ) व राष्ट्रीय काँग्रेस पार्टी च्या वतीने तहसील परिसरात काळ्या फिती व काळे कपडे घालून राज्यातील महायुती सरकारचा जाहीर निषेध केला.
निवेदनात ते म्हणतात की, (Badlapur Harassment Case) बदलापूर येथील आदर्श विद्या मंदिर शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच नराधम कर्मचाऱ्यांनी पाशवी अत्याचार केले. ते मानव जातीला काळीमा फासणारे आहे. सध्या राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. या घटनेची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर हे प्रकरण कायदेशीर मार्गाने हाताळण्यात येत असली तरी अन्यायग्रस्तांना न्याय मिळेल याची शाश्वती वाटत नाही. (Badlapur Harassment Case) घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे, एड. वीरेंद्र राजे, राजू वाकडे,काँग्रेसचे डॉ. मोहम्मद नदीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे साहेबराव ठेंगे, नाना जळगावकर,सुरेश धनवे, रवी पांडे, संजय भोणे, राजिक देशमुख,विकास जामकर, एड गजानन देशमुख, दीपक अवचार, जिया शेख, विजय बाबर, साकिब शहा, मालती मिश्रा, विद्यांजली पोहरकर, धनंजय जैन, संजय पाटील कान्हेकर, चंद्रकांत चावडा, अनिल शिंदे, दीपक जाधव, अशा मुळे,सुमन माटे, शारदा आढाव, बेबी ढेकळे, कमल ढेकळे, सरोज टनमने, बेबी घोडेकर, माधव जाधव, सादिक भाई लोहार, हर्षद साकला, रवी बहादुरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.