कळमनुरी (Badlapur Harassment Case) : बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस ठाणे हद्दीतील शाळेच्या परिसरात पोलिसांची करडी नजर राहणारा असून त्यासाठी पोलीस ठाण्याने एका पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली.
मुलींची छेड काढणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे. शाळेच्या परिसरात फिरणाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. शाळांनी शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत याबाबत शाळांना सांगण्यात आल्याची माहितीही पोलीस निरीक्षक भोसले यांनी दिली. (Badlapur Harassment Case) शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात मुलींची छेडछाड रोखण्यासाठी महिला पोलीस पथक तयार करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक भोसले यांनी त्यांच्या स्वतःचा मोबाईल क्रमांक शाळा व विद्यार्थिनींना दिलेला आहे काही अडचण असल्यास कोणत्याही वेळेला मोबाईल लावा. मदत तत्काळ मिळेल असेही त्यांनी सांगितले. कळमनुरी शहरात अनेक विद्यार्थिनी ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येतात येथील बसस्थानकावरही पोलीस तैनात राहणार आहे. मुलींच्या संरक्षणासाठी पोलीस सदैव तत्पर असल्याचेही त्यांनी सांगितले.
बदलापूर (Badlapur Harassment Case) येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. तसेच साध्या वेशातील पोलिसही शाळा परिसर व बस स्थानकात तैनात करण्यात आले आहेत. शाळेमध्ये असलेल्या तक्रारपेटीतही मुलींनी काही अडचण असल्यास तक्रार करावी. असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे