या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा देण्याची निवेदनाद्वारे मागणी
पुसद (Badlapur protest) : बदलापूर येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला बिना जामीन जेरबंद ठेवून (Badlapur protest) सदर प्रकरण जलद गती न्यायालय मार्फत चालवून अमानुष अत्याचार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी दि. 21 ऑगस्ट रोजी एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत शिवसेना (उबाठा) कडून करण्यात आली आहे.
दुपारी 12 वा. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिला आघाडी व शिवसेना(उबाठा ) कडून घटनेचे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह सर्वांनीच निषेधाच्या घोषणा दिल्यात, महायुती सरकारच्या काळामध्ये जनसामान्यांसह महिला असुरक्षित असून शाळकरी विद्यार्थिनी सुद्धा सुरक्षित नाहीत, गृहमंत्रालयाचा व गृहमंत्र्यांचा राज्यातील (Badlapur protest) गुन्हेगारांवरचा वाचक कमी झालेला दिसत असून यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
तर महिलांनी आपल्या हातामध्ये ” लाडली बहीण योजना नको, तर सुरक्षित बहीण योजना द्या ” या आशयाचे फलक झळकविले हे विशेष निवेदनावर एड. वीरेंद्र राजे, विजय बाबर, रवी पांडे, विकास जामकर, बबन देशमुख, सौ.अश्विनी वीरेंद्र राजे,मालती मिश्रा , विद्यांजली पोहरकर, , कविता व्यवहारे, , रेशमा बहादुरे, इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.