शिक्षणनगरी लातूरच्या शिकवणी परिसरात घटना
लातूर (Badlapur students Case) : तू बदलापूरचा आहेस, रेपिस्ट आहेस… म्हणून शिकवणी परिसरात एका १६ वर्षीय विद्यार्थ्यांस टोळक्याने मारहाण केली. यातून झालेल्या वादात तिघेजण जखमी झाले असून, याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक जण गंभीर, शिवाजी नगर पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेबाबत माहिती अशी की, दुपारी ४ च्या लातूरच्या शिकवणी परिसरात बदलापूर (Badlapur students Case) येथील रहिवाशी आणि लातुरात शिक्षणासाठी विद्यार्थी पृथ्वीराज सावंत हा कॅफेवर बसला असता अतुल कसबे (रा. कॉईल नगर, लातूर) हा त्या ठिकाणी आला. त्याने सावंत यास तू बदलापूरचा आहेस, रेपिस्ट आहेस म्हणून छेड काढत डोक्यात मारहाण करत जखमी केले. यावेळी कॅफेचालक याच्या मध्यस्थीने वाद सोडविण्यात आला. परंतु यावेळी जमा झालेल्या टोळक्याने या ठिकाणी गोंधळ मारहाण, दगडफेक केली. यावेळी झालेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. यातील सिद्धार्थ दुर्गेश हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्व. विलासराव देशमुख सर्वोपचार रुग्णालय लातूर येथे उपचार सुरु आहेत.
दरम्यान पृथ्वीराज सावंत यांने दिलेल्या फिर्यादीवरून लातूरच्या छत्रपती शिवाजी नगर पोलीस ठाण्यात अतुल कसबे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Badlapur students Case) घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कवळे हे करत आहेत.
पोलीस सध्या गुटख्यावर ‘लक्ष’ ठेवण्यात मग्न!
लातूर हे एक शैक्षणिक केंद्र असून या ठिकाणी राज्याच्या कानकोपऱ्यातून शिकण्यासाठी विद्यार्थी येतात. तसाच पृथ्वीराज सावंत हा विद्यार्थी इथे शिकण्यासाठी आला असून त्याला येथील मुजोर टोळक्याच्या वादास सामोरे जावे लागले. पोलीस सध्या गुटख्यावर लक्ष ठेवण्यात मग्न असल्याने त्यंचा धाक कमी पडत आहे. परिणामी या (Badlapur students Case) भागात दररोज कांही ना काही तरी अनुचित घटना घडत आहेत. ही लातूरकरांसाठी चिंतेची बाब बनली आहे.