नरूनदास पवार यांच्या बैलजोडीला द्वितीय पुरस्कार
नांदगाव पेठ (Bail Pola) : स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी (Bail Pola) पोळ्याला बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी सुद्धा केकतपूर येथील शेकडो बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. यामध्ये ऋषिकेश उमेश महाराज मास्कर यांच्या बैलजोडीने प्रथम पारितोषिक पटकावले तर नरूनदास पवार यांच्या बैलजोडीने द्वितीय पारितोषिक प्राप्त केले.
स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
पोळ्याच्या सणाला शेतकऱ्यांचा उत्साह वाढावा यासाठी स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षी अमरावती तालुक्यात विविध ठिकाणी बैलजोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करत असते. केकतपूर याठिकाणी बैलजोडी स्पर्धेमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने,सामाजिक संदेश देत आपल्या (Bail Pola) बैलजोडीला स्पर्धेत सहभागी केले होते. ट्रस्टच्या वतीने नेमण्यात आलेल्या समितीने ऋषिकेश उमेश महाराज मास्कर यांच्या बैलजोडीला प्रथम पारितोषिक तर नरूनदास पवार यांच्या बैलजोडीला द्वितीय पारितोषिक घोषित करून विजयी शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
भाजपा जिल्हा सरचिटणीस तसेच स्व. हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विवेक गुल्हाने यांच्या संकल्पनेतून पूर्णत्वास जात असलेल्या या (Bail Pola) बैलजोडी सजावट स्पर्धेला केकतपूर येथील सरपंच चरनदास भुजाडे, भाजपा कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य अमित भुजाडे, नरेंद्र राजूरकर,राजू खुरसडे, सुधीर जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष दर्यादास भोसले, गजानन भुजाडे, रमेश राजूरकर, आकाश तोमर,नारायण चौधरी, मारोतराव वरखडे,दिनेश मेश्राम, भारतसिंग पवार,प्रेमराज सराठे, मंगेश पवार,उमेश महाराज, संतोष चौधरी,रुपेश डीवरे,राहुल राजूरकर, वेदांत सातपुते, शैलेश चौधरी, स्वप्नील हरणे, अंकुश वाघ,गजानन वाठ तसेच समस्त गावकरी मंडळी,भाजपा कार्यकर्ते व स्व.हिराबाई गुल्हाने चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.