वर्धा (Wardha) :- नोकरी लावण्याचे आमीष दाखवून युवकाची सहा लाख रुपयांनी फसवणूक (Fraud) करण्यात आली. ही घटना रासा शिवारात घडली. याप्रकरणी गिरड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला.
आकाश गजभिए याने एअरलाईनमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले
नागपूर जिल्ह्यातील युवकास जीपीओ नागपूर मल्टी टास्कींग (Multi tasking) स्टाफमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. पोलिसांनी सुधाकर नारायण चाफले रा. लोखंडी, ता. समुद्रपूर, राजेश आनंद लवंगे, रा. गिट्टीखदान नागपूर, आकाश पवन गजभिये रा. नागपूर, इमरान मोहमद शेख रा. नागपूर तसेच मंगेश नामक इसमाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला. सुधाकर चाफले याने युवकास नोकरी लावून देतो, असे सांगितले. त्याने राजेश लवंगे, आकाश गजभिए या दोघांसोबत ओळख करून दिली. राजेश लवंगे याने युवकास आंध्रप्रदेश येथे प्रशिक्षणाला जावे लागेल, त्यानंतर विमानतळ नागपूर येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. तसेच आकाश गजभिए याने एअरलाईनमध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. राजेश अणि आकाश या दोघांनी इमरान मोहमद शेख याच्याशी ओळख करून दिली, त्याने नोकरी संबंधाने मुलाखतीचे पत्र पाठविले. त्याने मंगेश नामक व्यक्तीने खोटे नियुक्तीपत्र दिले. पाचही जणांनी युवकाची ६ लाख १७ हजार ८५४ रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी गिरड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.