लातूर(Latur):- सेल्समन (Salesman)पदावर काम करणाऱ्या गणेश बेकरीतील तरुणाचा नांदेड (Nanded)जिल्ह्यात भोकर किनवट रस्त्यावर अपघात (Accident)झाल्यानंतर त्यात मृत्यू पावलेल्या खंडापूर येथील रहिवासी तरुणाच्या मृतदेहासह (deadbody) खंडापूरकरांनी लातूरच्या एमआयडीसीतील गणेश बेकरीमध्ये ठिय्या मांडत नुकसान भरपाईसाठी आंदोलन केले. सुरुवातीला नकार घंटा वाजविणाऱ्या बेकरीच्या व्यवस्थापनाने अखेर नुकसान भरपाईचा धनादेश दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
नुकसान भरपाईपोटी ८ लाखांचा धनादेश दिल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला
गणेश सुरेश मुलगे हा तरुण गणेश बेकरीत सेल्समन म्हणून काम करतो. नांदेड जिल्ह्यात अपघातात मृत्यू झाल्यानंतर नुकसान भरपाईची मागणी करुनही बेकरीच्या व्यवस्थापनाने टाळाटाळ केली. त्यामुळे अ. भा. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे(Corruption Eradication Committee) अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रहारचे जिल्हा प्रमुख रा. चौगुले यांच्यासह अनेकांनी तरुणाच्या मृतदेहासह मंगळवारी रात्री ठिय्या दिल्यानंतर व्यवस्थापनाने नमते घेत नुकसान भरपाईपोटी ८ लाखांचा धनादेश दिला. त्यानंतर तरुणाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.