-अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या
बाळापूर (Balapur ) वाढत्या महागाईमुळे व अवकाळी पावसामुळे नेहमीच शेतकरी हवालदिल व कर्जबाजारी होत आहे. ट्रॅक्टर मशीन (Tractor machine) अशा यांत्रिकीकरणाने शेतीची मशागत सोपी झाली खरी, परंतु अलीकडच्या काळात विविध यंत्रांच्या किमती वाढल्या. त्यात लागणारे डिझेल, पेट्रोलचे (Diesel, Petrol) दर भरमसाठ वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहेत. कृषी निविष्ठा, (Agricultural inputs) रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे यांच्या किमती मनमानीपणे वाढल्या जात आहेत. त्यामुळे खर्च लाखात होत असेल तर उत्पादन मात्र हजारातच येते. एक एकर शेतीचा खर्च २५ ते ३० हजार रुपये होतो, मात्र उत्पन्न १८ से २० हजार होत आहे. त्यात शेतमालाला मिळत असलेला कवडीमोल भाव कारणीभूत आहे. यात अल्पभूधारक मोठी अडचण अधिकचे पैसे मोजूनही मजूर कामावर असून, खर्च अधिक उत्पन्न कमी त्यात ना शेतकन्याला पीक विमा ना मेटाकुटीस येत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे. पंपाचे पाइप, मजुरीच्या दरात प्रचंड वाढ, वीज बिलासह अन्य बाबींचादेखील वाढत्या मशागत खर्चाला हातभार आहे. यात महागाईमुळे शेतकरी हवालदिल सर्वात मोठी अडचण मजुरांची आहे. शोधूनही मजूर मिळत नाही मिळालेच तर मजूर कमी वेळासाठी जास्त रक्कम घेतात
– डिझेल-पेट्रोलवर सबसिडी हवी
मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरधारकांना (Tractor owners) डिझेलच्या किमतीमध्ये सबसिडी द्यावी, त्यामुळे शेती मशागतीवरील खर्चाचा भार कमी होईल. गेल्या वर्षीपेक्षा यंदा नांगरणी दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हंगामात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने (State Govt) डिझेलवरील कर कपात (Tax reduction on diesel) करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांना अद्यापही कुठलीच मदत ना पीक विमा ना अतिवृष्टी ना सततच्या पावसाची कुठली मदत अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही. ती मिळाल्यास मशागततरी होईल. याआशेने शेतकरी बँकात चकरा मारत आहेत. अजूनही शासनाने खात्यात पैसे टाकल्याचे दिसत नाहीत.