बाळापूर (Balapur Crime) : राष्ट्रीय महामार्गावरील व्याळा येथील ममता बिअर बारचे व्यवस्थापकास लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी ३ जणांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. परंतु (Balapur Crime) पोलीसांच्या हलगर्जीपणामुळे आरोपी अद्याप फरार आहे.
या (Balapur Crime) संदर्भात प्राप्त माहितीनुसार व्याळा येथील ममता बिअर बारमध्ये शुभम काशीनाथ कापसे हा युवक व्यवस्थापक म्हणून काम करीत असताना शुक्रवारी तीन युवक आले होते. त्यांचे बिल ३४०० झाले होते. परंतु आम्हाला दिलेले बिल हे जास्त लावल्याचे कारणावरून वाद घालून शुभम कापसे ह्यास शिवीगाळ करून लोखंडी पाइपने मारहाण केली होती. त्यामध्ये शुभम कापसे ह्याचे डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
वैद्यकीय उपचारानंतर (Balapur Crime) बाळापूर पोलिसांनी बी. एन. एस. कलम ११८ (१) ११५, ३५१ (२) ३ (५) अन्वये आदित्य दौड रा. रामगाव, कुणाल डाहाके रा. सिरसो व रूतूजा धोत्रे रा. रामगाव या तिघांविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास (Balapur Police) बाळापूर पोलिस करीत आहेत. परंतू पोलिसांच्या पोलीसाचंची हलगर्जीपणामुळे आरोपी अद्याप फरार आहे. असा आरोप फिर्यादीकडून होत आहे.