सर्वोपचारात जखमींवर उपचार, एकाची प्रकृती चिंताजनक
गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
बाळापूर (Balapur Crime) : तालुक्यातील हातरुण गावात एकाच समाजाच्या दोन गटांत मोठा राडा झाला. यावेळी दोन्ही गटातून दगडफेक झाल्याने यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना जिल्हा सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या (Balapur Crime) घटनेत एक वाहनही जाळण्यात आल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना या घटनेची माहिती होताच तत्काळ दाखल होत गावात तगडा बंदोबस्त लावण्यात आला असून (Balapur Crime) सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.
दगडफेकीसह वाहनांची केली जाळपोळ
हातरुण येथे पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याच्या संशयावरून सोमवारी दुपारच्या सुमारास एका गटातील काही जणांनी दुसर्या गटावर हल्ला चढविला. यानंतर दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली. दोन्ही गट आमने-सामने येऊन दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यास सुरूवात करण्यात आली. तसेच एक चार चाकी वाहन पेटवण्यात आले. या (Balapur Crime) घटनेत सहा जण जखमी झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या सर्व जखमींवर अकोल्यातील सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या (Balapur Crime) घटनेप्रकरणी उरळ पोलिसांनी दोन्ही गटातील काही तिघांना ताब्यात घेतले आहे. तसेच गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.