लातूरच्या सभेत वंचितचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांची भविष्यवाणी
लातूर (Balasaheb Ambedkar) : मुलगी चांगली नसेल आणि बघायला गेलात तर तुमचे स्वागत दणकेबाज होते, तसेच स्वागत परदेशात मोदींचे होत आहे. मात्र भारताच्या गळ्यात काय मारले, हे थोडीच दाखवले जाणार आहे? असे म्हणत आगामी काळात महागाई अजून वाढणार, रुपयाचे अवमूल्यन होणार आणि शेतकरी लुटला जाणार, अशी भविष्यवाणी (Vanchit bahujan Aghadi) वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी केली. लातूर येथे व्ही.एस. पँथर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit bahujan Aghadi) पदाधिकारी व अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यामध्ये आगामी दोन महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकांचा संदर्भ देत प्रकाश आंबेडकर म्हणाले, जिंकायचे असेल तर विकास नव्हे, दंगल हा बेस झाला आहे. लोकांनो तुम्हाला हे मान्य आहे का? असा सवाल केला. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, सरकार नियंत्रण करू शकत नाही, असे सांगून राज्यात विकासाच्या मुद्द्याकडून समाज विभाजनाकडे जनतेचे लक्ष नेण्याचा राजकीय डाव आहे. विभाजनात सामाजिक आशय आल्याने परिस्थिती धोक्याबाहेर गेल्याचे ते म्हणाले. वंचित बहुजन आघाडीने ओबीसी बचाव यात्रा काढल्याने मराठवाडा शांत राहिला; अन्यथा मराठवाडा पेटला असता असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
ओबीसीतून आरक्षण (OBC reservation) मिळावे ही मनोज जरांगे यांची मागणी आहे. शरद पवार या मागणीला पाठिंबा आहे म्हणून सांगायला तयार नाहीत आणि विरोध आहे म्हणूनही सांगायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली. जात म्हणून मतदान करणार असाल तर देशाचे सर्वात मोठे विरोधक आपणच आहात, असा इशारा त्यांनी उपस्थितांना यावेळी दिला. भाजपचा दोन दिवसात पोलखोल करू, असा इशाराही (Balasaheb Ambedkar) त्यांनी दिला.
अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या वर्गीकरणाचा उल्लेख करून आंबेडकर म्हणाले की, हा निर्णय लागू झाला तर राखीव जागेवर या प्रवर्गाला निवडणुका लढवण्याचा मार्ग बंद होणार आहे. कारण ज्याला आरक्षणाचा एक लाभ मिळाला, त्याला दुसरा लाभ घेता येणार नाही आणि एका कुटुंबाला एकदाच आरक्षणाचा लाभ घेता येईल, अशा तरतुदी यात आपल्याचे आंबेडकर (Balasaheb Ambedkar) यांनी यावेळी सांगितले.
आगामी काळात नीतीमत्ता इभ्रत ही महत्त्वाची असून चळवळ, इज्जत राखली गेली पाहिजे. यासाठी चारित्र्य जपणे आवश्यक आहे. आपण स्वतः विकायचे की नाही, हे आपणच ठरवायचे असे सांगून ‘ज्याला चारित्र्य नाही, त्याला चळवळ नाही’, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे, असा संदर्भही त्यांनी (Balasaheb Ambedkar) या सभेत दिला.