आरोग्य विभागाचा निर्णय
देशोन्नती वृत्तसंकलन
गोंदिया (Health Department) : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ब या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर आयुर्वेद पदवीधारकांना (BAMS graduates) कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून विविध शासकीय (Health Department) आरोग्य आस्थापनात नियुक्त करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील हजारो आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा यंत्रणेला रिक्त पदांचे ग्रहण लागले आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेतील कामकाज आणि लाखो सर्वसामान्य जनता, रुग्ण यांना आरोग्य सेवा मिळण्यात मोठी अडचण होत आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय अधिकारी (गट ब) ची भरमसाठ पदे रिक्त आहेत. गोंदिया जिल्ह्यासह राज्यातील बहुतेक जिल्ह्यात असेच विदारक चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्वच आरोग्य आस्थापनात अशीच स्थिती आहे.
यासंदर्भात केंद्रीय आयुष, (Health Department) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री नामदार जाधव यांनी, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाला नियमित नियुत्क्त्या होईपर्यंत पर्यायी वैधकीय अधिकारी नेमण्याचे निर्देश नुकतेच दिले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाने (खात्याने) नियमित नियुक्त्या होईपर्यंत आयुर्वेद पदवीधर उमेदवारांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात २४ सप्टेंबर २०२४ रोजी (Health Department) आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील निर्गमित केला आहे. त्यामुळे आता (BAMS graduates) बीएएमएस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्यामुळे आता बीएएमएस डॉक्टरांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी (गट ब) ) म्हणून नियुक्ती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यातील उपजिल्हा रुग्णालय, आयुर्वेद व अलोपॅथी दवाखाने, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, फिरती आरोग्य पथके, दवाखाने यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट’ ब’ या संवर्गातील पद कंत्राटी पद्धतीने आणि आयुर्वेद पदवीधर मधून भरण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २० डिसेंबर २०२२ रोजीच्या शासन निर्णय मधील अटी आणि शर्ती ला अनुसरून या नियुत्क्त्या करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट ‘ब’ या संवर्गातील रिक्त पदांवर नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होईपर्यंत रिक्त जागेवर बी ए एम एस अहर्ताधारकांना कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात येणार आहे.