हिंगोली (Bangladesh protest) : बांगलादेशमध्ये हिंसाचार झाल्याने हिंदू धर्मीयांच्या मंदिरांची तोडफोड व हिंदू समाजावर अन्याय अत्याचार केला जात असल्याने हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहर बंदची हात देऊन निषेध नोंदविला जाणार आहे. (Bangladesh protest) बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराच्या निषेधार्थ सर्वच स्तरातून निषेध नोंदविला जात आहे.
त्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर, वसमत शहर, कळमनुरी शहर व सेनगाव शहर बंदची हाक 17 ऑगस्टला देण्यात आली आहे त्यानिमित्ताने बाजारपेठ बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसील कार्यालयात हिंदू संघटनांच्या वतीने निवेदन देऊन (Bangladesh protest) निषेध नोंदविला जाणार आहे. हा बंद शांततेत पाळला जाणार आहे. कुठेही अनुचित घटना घडू नये या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.