परभणीत हिंदूंचा विराट मोर्चा; पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त
परभणी (Bangladesh Protests Hindu march) : बांगला देशाचे विभाजन करून हिंदूंसाठी स्वतंत्र हिंदू देशाची निर्मिती करावी. जर भारत-पाकिस्तान हिंदू-मुस्लिमच्या आधारावर वेगळे केले जाऊ शकतात तर (Bangladesh Protests) बांगलादेशात हिंदूंसाठी स्वतंत्र देश होऊ शकतो, अशी मागणी परभणी येथील हिंदूंच्या विराट मोर्चात सुरेश चव्हाणके यांनी केली.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंदूंच्या हत्या, अत्याचार, अन्याय, छळ याचा निषेध करण्यासाठी व (Bangladesh Protests) बांगलादेशातील हिंदू समर्थनात रविवार १८ ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरात विराट मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी व्यासपीठावर सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके, स्वामी हरीचंद्र चैतन्य महाराज, स्वामी भारतनंद सरस्वती महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना चव्हाणके म्हणाले की, परभणीतील मोर्चासाठी मला न येऊ देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बांगला देशात हिंदूंवर आलेली वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही. त्यासाठी वेळीच प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्यामध्ये बांगलादेश आंदोलन (Bangladesh Protests), लव्ह जिहाद समर्थकांच्या आर्थिक बाबींवर बहिष्कार टाकणे, लहान मुलांना वेळ काढून संस्कार करणे, हिंदूंनी आप-आपसात भांडणे टाळणे सह धर्मसंस्कार द्यावेत. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या त्यामध्ये बांगलादेशाचे विभाजन करून स्वतंत्र हिंदू राष्ट्र तयार करणे, जो हिंदू भारतात येण्यासाठी तयार आहे त्यांना सामावून घेणे, एनआरसी लागू करणे, लव्ह जिहाद विरोधात कायदा करणे, वक्फ बोर्ड रद्द करणे यासह महाराष्ट्रातील गडकिल्यांवरील अतिक्रमणे काढावीत आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्रात ८० लाख घुसखोर असून त्यांच्या विरोधात जनता एन.आर.सी. नावाने लवकरच आंदोलन उभे करण्यात येईल. शिवप्रतिष्ठाणचे धारकरी हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरत असतात. त्यांनी कधीही मला हाक द्या मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासीत केले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोर्चात सकल हिंदू समाज मोठया संख्येने उपस्थित होता.