शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांची मागणी
पोलिस आयुक्तांना निवेदन सादर
अमरावती (Shiv Sena Sunil Kharate) : बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात बेकायदा व बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा पुढे आला असून पोलीस प्रशासनाने अमरावती शहरातील विविध भागात कथितरित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा (Bangladeshi citizens) शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांची देशातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली असून या मागणी संदर्भात शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांचे नेतृत्वात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांना निवेदन सादर करण्यात आले.
अमरावती शहरातील विविध भागात काही बांगलादेशी नागरिक आपली ओळख लपवून व बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याची माहिती असून ते (Bangladeshi citizens) बांगलादेशी विविध उद्योग व एमआयडीसी मधील फॅक्टरीमध्ये कार्यरत असल्याचे समजते. अमरावती शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि कुठलीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोहीम राबवित शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करीत त्यांची देशातून हकालपट्टी करावी, अशी मागणी याप्रसंगी (Shiv Sena Sunil Kharate) सुनील खराटे यांनी केली.
यावेळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडी यांनी सविस्तर चौकशी करून शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही शिवसेनेच्या शिष्टमंडळास दिली.निवेदन देताना सुनील खराटे शिवसेना (उ.बा.ठा.)जिल्हाप्रमुख,अम. यांच्या नेतृत्वात ,सुधीर भाऊ सूर्यवंशी शिवसेना उपनेते तथा संपर्क प्रमुख,अम. प्रतिभाताई बोपशेट्टी, मनीषाताई टेंबरे ,जिल्हा प्रमुख,महिला आघाडी,राजश्री जठाळे,शहर प्रमुख, जयश्री कुऱ्हेकर पंजाबराव तायडे विजय मंडले , सुमित राऊत , रवी अंबळकर कुचीन कैतवास राजू अक्कलवार महेश पवार संदीप इंगोले निलेश सावळे विकास शेळके शिवम पंचवट विजय बेनोरकर शेखर घिमे,प्रकाश बांदे सुमित पुनसे जयंत इंगोले अतुल सावरकर गौरव चांदुरकर सुभाष गायगोले संजय गोंडाने आतिश मेश्राम गोलू तंबोले अमित निंदाणे विकी बाबू आशिष वस्ताद शिवम धेंडवाल निलेश तंबोले यस्तेजी कालो निंदाने सुरेश वानखडे नजीर पठाण राज तंबोले कैलास अवघड महेंद्र नागलकर सतीश सरकटे अतुल सावरकर गौरव चांदुरकर सागर ढोकेउपस्थित होते.
शिवसेना स्टाईलने निपटणार
खराटे बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराचा आम्ही निषेध करीत असून केंद्र सरकारने या संदर्भात कडक भूमिका घ्यावी अशी आमची मागणी आहे. येत्या आठ दिवसात पोलीस प्रशासनाने अमरावती शहरातील बांगलादेशी नागरिकांना हुडकून न काढल्यास आम्ही शिवसेना स्टाईलने बेकायदा राहणाऱ्या बांगलादेशींना शोधून त्यांचा समाचार घेऊ असा इशारा सुनील खराटे (Shiv Sena Sunil Kharate) यांनी याप्रसंगी दिला.
मुस्लिम समाज बांधवांना आवाहन
अमरावती शहरात राहणाऱ्या मुस्लिम समाज बांधवांनी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांची माहिती पोलिसांना किंवा आम्हाला द्यावी जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे (Shiv Sena Sunil Kharate) यांनी केले आहे.