अकोला जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ
Akola News:- अकोला अकोला शहरासह जिल्ह्यात बनावट दस्तऐवजाद्वारे बांगलोदशी, रोहिंग्यांनी १५ हजार ८४५ जन्माचे दाखले मिळविल्याचा मोठ्या घोटळ्याचा गंभीर आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी केल्याने अकोल्याच्या प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे बनावट दाखले(Fake certificates) तयार करणारी टोळी व संबंधित या प्रकारामुळे चांगलेच अडचणीत येणार असून, शासनाने याबाबत एसआयटी चौकशी करण्याचे जाहीर केले आहे.
भाजपा नेते किरिट सोमय्यांनी केला मोठ्या घोटाळ्याचा आरोप
अकोला जिल्ह्यामध्ये जन्म झाल्याचे प्रमाणपत्र(Birth Certificate)अर्थात दाखले मिळविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी करून तसे एकूण आकडेवारीसहित विवरण असलेले अकोला जिल्हाधिकारी यांचे पत्र जाहीर केले आहे. त्यांच्या या आरोपामुळे प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली आहे. तर शासनाचे उपसचिव महेश चसहकर यांनी या गंभीर प्रकरणाची ‘एसआयटी’द्वारे चौकशी करण्याचे लेखी पत्र जिल्हा प्रशासनाने जारी केले आहे. त्यामुळे या बनावट जन्म दाखले अर्थात प्रमाणपत्रे देणाऱ्यांचे चेहरे या कार्यवाहीतून समोर येणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात १५ हजार ८४५ बांगलादेशी, रोहिंग्याना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा घडला असल्याचा दावा भाजपा नेते किरिट सोमय्या यांनी केला आहे.
शासनाने भारत शासन राजपत्राव्दारे जन्म मृत्यू नोंदणी
कायदा, १९६९ मध्ये सुधारणा करून उशिरा जन्म व मृत्यू नोंदणीसंबंधीचे अधिकार हे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी यांना प्रदान केले. या सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीसंदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींची चौकशी करण्याकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार सदर सुधारणेनुसार उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये, असे शासनाचे उपसचिव महेश चरूकडर यांनी नमूद केले आहे.