आ. इंद्रनील नाईक यांच्या हस्ते उपोषणकर्ते जिनकर राठोड यांना ज्यूस पाजून सांगता
पुसद (Indranil Naik) : गेल्या 23 जूनपासून बंजारा समाजाच्या आरक्षणासह (Banjara Reservation) विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय तांडा सुधार समिती व अखिल भारतीय बंजारा युवा सेना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जिनकर सुदाम राठोड यांनी राज्य शासनाला निवेदन पाठवून हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नाईक चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते.
गेल्या 13 दिवसापासून ते सातत्याने आपल्या मागण्यांचा रेटा प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे रेटत होते. काही दिवसांअगोदर त्यांनी ब्राह्मणगाव येथे सुद्धा याच मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले होते. त्याही वेळेस त्यांच्या उपोषणाची सांगता आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांच्या हस्ते लिंबू सरबत पाजून झाली होती. हे विशेष तर आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी त्यावेळी दिलेल्या आश्वासनाला जागत त्यांनी विधिमंडळामध्ये गतवर्षीच्या सेशनमध्ये यासंदर्भात आवाज उठविला होता. वीजभज तत्कालीन मंत्री यांनी त्यांना विधिमंडळात एसआयटी स्थापन करून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तर 4 जून रोजी सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये पुन्हा आमदार इंद्रनील नाईक यांनी या संदर्भात आवाज उठविला होता. अध्यक्ष महोदय यांना गतवर्षी मंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली.
कारण मंत्री महोदयांनी एसआयटी लावलीच नव्हती. हे विशेष दि. 6 जुलै रोजी असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमदार इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी उपोषण मंडपात जाऊन उपोषणकर्ते जिनकर राठोड त्याच्या समर्थक असलेल्या संघटनांच्या प्रमुखांसह चर्चा करून ज्यूस पासून उपोषणाची अखेर तेराव्या दिवशी सांगता केली. (Banjara Reservation) यावेळी प्रशासनातर्फे तहसीलदार महादेवराव जोरवर हे उपस्थित होते. तर शेतकरी नेते मनीष जाधव, माजी जीप सदस्य बाबुसिंग आडे, गोर सेनेचे जय राठोड, याडीकार पंजाबराव चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, विकास राठोड, प्रा. जाधव, गृहरक्षक दलाचे संजय राठोड, विजय राठोड, यांच्यासह गोपनीय विभागाचे नितीन भालेराव, दैनिक देशोन्नतीचे दीपक महाडिक, विजय निखाते, शेषेराव राठोड, आमदार महोदयाचे अंगरक्षक भिसे यांच्यासह इत्यादी मान्यवर उपस्थित होते.